गुरूवार, जून 8, 2023

आठवड्याचा पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स तब्बल इतक्या अंकांनी घसरला

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । लाँग वीकेंडनंतर आज आठवड्याचा पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (Stock Market) मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स (Sensex) ९१३ अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीतही (Nifty) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळी निफ्टी २३० अंकांनी घसरला आहे.

दरम्यान, शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद असून त्यादिवशी कोणतेही व्यवहार शेअर बाजारात झाले नव्हते. तर त्यापूर्वी गुरुवारी सेन्सेक्स 38 अकांच्या किंचित उसळीसह ६०,४३१ वर बंद झाला होता. आज सकाळी सेन्सेक्स ९१३ अंकांनी घसरून ५९,५१७ वर आला आहे. तर निफ्टी २३० अंकांनी घसरली असून त्यामुळे १७,५९७ वर आली आहे.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. इन्फोसिसच्या कमकुवत निकालांमुळे स्टॉक 10 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे बाजारावर दबाव आला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये मोठी घसरण होत आहे. SGX निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली असून इंडेक्स 17800 च्या खाली व्यवहार करत आहे. आशियाई बाजारांमध्ये निक्केई आणि कोस्पी देखील लाल चिन्हानं व्यवहार करत आहेत. त्याचप्रमाणे DOW, Nasdaq आणि S&P देखील यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत.