---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

शरद पवारांचं गिरीश महाजनांबाबत खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले वाचा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीत भाग घेतला. यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक विधान केलं आहे. गिरीश महाजन काय बोलतात, काय करतात हे मी बोलू इच्छित नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचं ठरेल, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

sharad pawar girish mahajan jpg webp

दरम्यान, गिरीश महाजन यांनी विरोधकांचा सुपडा साफ होईल असा दावा केला असून त्याबाबत तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. महाजन काय बोलतात आणि करतात यावर मी भाष्य करू इच्छित नाही. ते फार अडचणीचं असेल. त्यामुळे मी भाष्य करू इच्छित नाही. व्यक्तीगत कुणासंबंधात मी उत्तर देऊ इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.

---Advertisement---

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपात पुन्हा घरवापसी करणार आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं.एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. एखाद्याला वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू असल्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित खडसेंनाही त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला असेल, असं शरद पवार म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---