---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

खा. शरद पवार जिल्हा दौऱ्यावर : घेणार पक्षाचा आढावा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याच्या उपस्थितीत अमळनेरमध्ये १६ जूनला राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते तर समारोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते होणार आहे.

sharad pawar 5 jpg webp webp

यावेळी पवार यांच्याकडून लोकसभा आणि विधानसभेची चाचपणी केली जाणार आहे. अशी माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झाली.

शरद पवार हे दोन्ही लोकसभा आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन कोणत्या ठिकाणी कोण संभाव्य उमेदवार असू शकतो, आघाडीत कोणाची कुठे ताकद आहे याची चाचपणी करण्यासोबतच सरकारने या निवडणुकांच्या आधी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखविली तर त्याचीही तयारी असावी, त्यादृष्टीने नियोजन केले जाणार आहे. लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक झाली तर त्यासाठी देखील पक्षाची तयारी असायला हवी म्हणून त्याचा आढावा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, योगेश देसले, विलास पाटील, अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, ॲड. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---