⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | ..तरच आम्ही तुम्हाला शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू

..तरच आम्ही तुम्हाला शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला तरी त्यांची आमदारकी काढून घेणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शरद पवारांसमोरच खडसेंच्या कन्या रोहिणी यांना माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिलेले आव्हान चर्चेचा विषय ठरले आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले तरच आम्ही तुम्हाला शरद पवार यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू, असे डॉ. पाटील यांनी रोहिणी यांना जाहीर सभेत सांगितले.

‘गेले ते गद्दार, राहिले ते खुद्दार’ अशी घोषणाही त्यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता केली. जामनेर येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते. लोकसभेसाठी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मागितली होती. तेव्हाही डॉ. पाटील यांनी त्यांना उमेदवारी जाहीर करू नका, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती.

त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पवारांच्या उपस्थितीतच रोहिणी खडसे खेवलकर यांना जाहीर आव्हान दिल्याने खडसेंविषयी त्यांच्या मनात कशाचा राग आहे, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहे. रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारली, कारण त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असे त्यांनी सांगितले आहे. पण विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी मुक्ताईनगर विधानसभा मविआच्या मतदारसंघातून उमेदवाराला मताधिक्य मिळवून द्यावे लागेल. तरच आम्ही तुम्हाला शरद पवारांची निष्ठावान कार्यकर्ती समजू, असेही ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.