प. वि. पाटील विद्यालयात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 25, 2021 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । केसीई सोसायटी संचलित प वि पाटील विद्या मंदिर येथे सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी गुगल मीट व युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून योग दिन साजरा केला.

p v patil vidyalay

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवले व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सोबत सदर प्रात्यक्षिके केली त्यात वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, मकर रास, सेतुबंधासन, पवनमुकरासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान इत्यादी योगासने व प्राणायाम विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केले.

सदर कार्यक्रमास उपशिक्षक योगेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले तर उपशिक्षक निवृत्ती चौधरी, सरला पाटील, दिपाली चौधरी, कल्पना तायडे, स्वाती पाटील, सूर्यकांत पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आधी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now