धरणगावात साडेसात किलो वजनाचा गांजा जप्त ; एकाला अटक

डिसेंबर 4, 2025 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगावात सुमारे साडेसात किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

dr gj

जळगाव जिल्ह्यात गांजा तस्करीचे प्रमाण वाढताना दिसत असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी मागच्या अनेक दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. तरी देखील चोरीछुपे जिल्ह्यात गांजाची तस्करी केली जात असल्याचं धरणगावातील कारवाईवरून दिसून येत आहे. धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. या कारवाईमध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई?

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांचे पथक तसेच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई या पथकाने कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now