जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या कॉम्प्युटर क्षेत्रातील ‘कोनव्हर्ज ए.आय’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत येथील महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.सोनल पाटील यांनी दिली.

‘कोनव्हर्ज ए.आय’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील शिफा समस्ती व अनिता भोई या दोन विध्यार्थिनीची निवड केली. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते.

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले, ऑफिसर प्रा. हर्षद पाटील, प्रा. स्वाती पाटील, प्रा. हिरालाल साळुंखे, प्रा. मनीष महाले, प्रा. अभिषेक ढोरे, प्रा. शितल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा, प्रा.रफिक शेख, प्रा.राज कांकरिया आदींनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?








