Breaking : जळगावात पोलीस ठाण्याजवळ सुरक्षारक्षकाला जाळले? आत्महत्या की घातपात?

जानेवारी 19, 2023 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून घातपात की अपघात असा तपास सुरू आहे. ईश्वर देवराम अहिरे असे मयताचे नाव आहे.

jalgaon-crime-security-guard-burnt

एमआयडीसी हद्दीत असलेल्या राम नगरात ईश्वर देवराम अहिरे वय-६६ हे परिवारासह राहतात. ते सुरक्षारक्षक म्हणून काम करून उदरनिर्वाह भागवतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे समजले. मराठे यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले आहेत. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा देखील जळून मृत्यु झाला होता तसेच काही दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने देखील आत्महत्या केली. अहिरे यांना दारूचे व्यसन होते तसेच तीन दिवसापूर्वी त्यांचा पगार झाला तेव्हापासून ते कामावर नव्हते. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now