परीक्षेविना रेल्वेत थेट नोकरी! १० वी/ITI उत्तीर्ण तरुणांसाठी मेगाभरती ; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

मे 9, 2026 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने १,६४४ ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीचे विशेष म्हणजे उमेदवारांना कोणतीही कठीण लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड थेट गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाणार आहे.

SECR Bharti 2026

या भरती प्रक्रियेत विविध ट्रेडमधील अप्रेंटिस पदांचा समावेश असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ४ जून २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) पर्यंत अर्ज करू शकतो

पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे?

शैक्षणिक पात्रता: अर्जदार उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा. यासोबतच संबंधित ट्रेडमधील NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे. वयाची गणना ५ मे २०२६ या तारखेनुसार केली जाईल. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. यामध्ये अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गाला ५ वर्षे, तर इतर मागास प्रवर्गाला (OBC) ३ वर्षांची सवलत मिळेल. दिव्यांग आणि माजी सैनिकांनाही नियमांनुसार सवलत लागू असेल.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची गुणवत्ता यादी खालील सूत्राने तयार केली जाईल:
इयत्ता १० वी मधील गुणांना ५०% वेटेज दिले जाईल.
आयटीआय (ITI) मधील गुणांना ५०% वेटेज दिले जाईल.
दोन्ही गुणांच्या सरासरीवर (Average) अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यादीत नाव आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा ?

१. सर्वप्रथम अधिकृत पोर्टल apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या.
२. तिथे तुमची नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
३. लॉगिन केल्यानंतर ‘Establishment Search’ या पर्यायावर जाऊन SECR Raipur शोधा.
४. तुमच्या संबंधित ट्रेडसमोरील ‘Apply’ बटणावर क्लिक करा.
५. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
६. तुमची १० वीची गुणपत्रिका, आयटीआय प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
७. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now