⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

द्वितीय वर्ष एम. फार्मसीच्या प्रेरणा तिवारी महाविद्यालयात प्रथम

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल येथील प्रगतीशील शेतकरी जितेंद्र तिवारी उर्फ ( राजु तिवारी ) यांची मुलगी प्रेरणा तिवारी हिने विद्यापीठात पाचवा व महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम. फार्मसी परीक्षेत येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल . महाविद्यालयाचे सात विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत चमकले. महाविद्यालयाच्या Quality Assurance शाखेचा १०० टक्के निकाल लागला. द्वितीय वर्ष एम. फार्मसीच्या प्रेरणा तिवारी हिने ९.८४ ग्रेड पॉइंट मिळवून विद्यापीठात पाचवा व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. निकिता पाटील (९.८३) हिने महाविद्यालयात द्वितीय, तर प्रीती शर्मा (९.८१) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. बारी व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योजक चिंतन पटेल एरंडोल शहरवासिय यांनी कौतुक केले.