सलग दुसऱ्या दिवशी मनपातील लिफ्ट बंद

जुलै 16, 2021 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । जळगाव शहर महानगपालिकेच्या ६ पैकी ३ लिफ्ट गुरुवारी बंद होत्या आणि  आज शुक्रवार उजाडला तरी देखील मनपाच्या लिफ्ट काही अजून सुधारला गेलेल्या नाहीत.गुरुवार प्रमाणे शुक्रवारीही या लिफ्ट मध्ये  नागरिकांची चांगलीच गर्दी होणार आहे. 

jalgaon manapa

जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासन जंगजंग पछाडत आहे. यासाठी नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. कोणीही नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कित्येक वेळेस ४ वाजेनंतर कोणतेही दुकान उघडे असेल तर त्या दुकानाला सील देखील लावण्यात येत आहे. 

इतके सगळे असले तरी ज्याप्रकारे दिव्याखाली अंधार असतो त्याचप्रकारे महानगरपालिकेची स्थिती झाली आहे. गुरुवारी व शुक्रवारी महानगरपालिकेतील सहापैकी तीन लिफ्ट या बंद होत्या व एक क्लिप ही मनपा कर्मचारी, आयुक्त व नगरसेवकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यामुळे इतर दोन लिफ्ट मध्ये प्रवेश मिळण्यासाठी नागरिकांची गुरवार प्रमाणे शुक्रवारीही एकच दमछाक उडणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now