MHT-CET साठी 10 मार्चला शिष्यवृत्ती वितरण व मोफत सेमिनार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवीसाठी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते या परीक्षेसाठी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शहरातील नोबेल फाउंडेशन तर्फे विनामूल्य सेमिनारचे आयोजन 10 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता नोबेल फाउंडेशन सभागृह येथे करण्यात आले आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना 50 दिवसात परीक्षेची तयारी कशी करावी तसेच सीईटी परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप कसे असते याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याप्रसंगी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शक तसेच नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील,प्रा एस जे पाटील, प्रा.योगेश पाटील, प्रा.प्राजक्ता राजपूत, प्रा.सुधीर महाले,हर्षल ठाकूर देवलसिंग पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी नोबेल फाउंडेशन तर्फे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत 30 विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था विनामूल्य दिली जाणार आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि पुस्तके दिली जाणार आहेत.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी असल्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेचे मार्गदर्शन घेऊ शकत नाहीत. यामुळे त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होतो.उन्हाळी कोर्सचा खर्च पालकांकडून पेलवत नाही म्हणून विद्यार्थी यापासून दूर राहतात. मुलांच्या करिअरचे नुकसान होऊ नये म्हणून नोबेल फाउंडेशन तर्फे सीईटी परीक्षेसाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे” असे जयदीप पाटील यांनी सांगितले. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 7218501444 या क्रमांकावर संपर्क साधावा