जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष ऑनलाईन व्यवहारांमुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. एसएमएस, ई-मेल यामाध्यमातून अनेकांना गंडा घातल्या जात आहे.अशातच सरकारची संस्था सायबर दोस्तने एक अलर्ट दिला असून नवीन फसवणुकीच्या जाळ्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. तुमच्या मोबाईलवर सुद्धा असा मॅसेज आला असेल तर लिंकवर क्लिक करु नका.
त्यात स्मार्टफोनधारकांना विशेषतः iPhone युझर्सला लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आयफोन युझर्सला आयमॅसेजवर एक मॅसेज पाठवण्यात येत आहे. हा मॅसेज इंडिया पोस्ट, टपाल खात्याचा असल्याचे भासवले जात आहे. पण हा मॅसेज पोस्ट ऑफिसने पाठवलेला नाही.
हा मॅसेज पोस्ट ऑफिसकडून पाठवण्यात आल्याचे भासवल्या जात आहे. हा मॅसेज स्मार्टफोन धारकांना येत आहे. त्यात एक लिंक आहे. त्यावर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते. हा मॅसेज टपाल खात्याकडून आल्याचे भासवत, तुमचे पार्सल आले आहे, पण चुकीचा पत्ता असल्याने, पत्ता योग्य नसल्याने ते डिलिव्हर होत नसल्याचा बनाव करण्यात येत आहे. त्यात एक लिंक देऊन युझर्सला माहिती भरण्यास सांगण्यात येत असल्याने अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
नाही तर पार्सल परत जाईल
या मॅसेजचे उत्तर पुढील 24 तासात नाही दिले तर तुमचे पार्सल परत पाठवण्यात येईल, असा इशारा मॅसेजमध्ये देण्यात आला आहे. सोबतच एक वेब लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास हॅकिंगची भीती वाढते. सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांना शिकार करत आहेत.तुम्ही योग्य लक्ष दिले तर, या मॅसेजमध्ये इंडिया पोस्टच्या वेबसाईटचे युआरएल चुकीचे देण्यात आल्याचे दिसून येईल. तुमच्या मोबाईलवर सुद्धा असा मॅसेज आला असेल तर लिंकवर क्लिक करु नका. हा मॅसेज डिलिट करा. कोणत्याही अनोळखी मॅसेजला उत्तर देऊ नका. तुमची माहिती शेअर करु नका. अशा मॅसेजची तक्रार करा.