⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | बातम्या | SBI सुरु केल्या ‘या’ दोन आकर्षक ठेव योजना; ‘इतके’ मिळेल व्याज..

SBI सुरु केल्या ‘या’ दोन आकर्षक ठेव योजना; ‘इतके’ मिळेल व्याज..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) दोन नवीन आणि आकर्षक ठेव योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये ‘हर घर लखपती’ (Har Ghar Lakhpati) आणि ‘एसबीआय पॅट्रन्स’ यांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून, एसबीआय ग्राहकांना त्यांची बचत आत्मविश्वासाने वाढवण्याची संधी देत आहे.

हर घर लखपती ही एक आरडी योजना आहे. सध्याच्या व्याजदरानुसार सामान्य लोक दरमहा केवळ 591 रुपयांची बचत करून 10 वर्षांत 1 लाख रुपयांचे भांडवल तयार करू शकतात. तर ज्येष्ठ नागरिक 574 रुपयांची बचत करू शकतात. तर एसबीआय पॅट्रन्स ही मुदत ठेव योजना आहे. ही याेजना 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

हर घर लखपती
गुंतवणूकदार हर घर लखपती योजनेत तीन ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. यामध्ये दरमहा अल्प बचत करून एक लाख रुपयांहून अधिक भांडवल तयार करता येते. मात्र, कोणत्याही महिन्यात खात्यात पैसे जमा न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या आरडीसाठी प्रत्येक 100 रुपयांवर प्रति महिना 1.5 रुपये दंड असेल आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या आरडीसाठी प्रत्येक 100 रुपयांवर 2 रुपये दंड असेल.

याेजनेत जर आगाऊ पेमेंट केले असेल, तर त्याचा परिपक्वता मूल्यावर परिणाम होणार नाही. सहा महिने सतत हप्ते न भरल्यास खाते बंद केले जाईल आणि त्यातील पैसे त्याच्याशी जोडलेल्या बचत बँक खात्यात पाठवले जातील. व्याज दराची गणना आणि 1 लाख रुपयांच्या मॅच्युरिटी रकमेसाठी दरमहा जमा करावयाची रक्कम खाली दिली आहे.

एसबीआय पॅट्रन्स
एसबीआय पॅट्रन्स 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा मुदत ठेवींवर 0.10 टक्के अधिक व्याज मिळेल. यामध्ये तुम्ही किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 3 कोटी रुपये जमा करू शकता. मुदत ठेवीचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांचा आहे. मात्र, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास सामान्य मुदत ठेवीइतकाच दंड भरावा लागेल.

या नवीन योजनांमधून, एसबीआय त्याच्या ग्राहकांना विशेष सोयी आणि वर्धित व्याजदर देऊन त्यांच्या आर्थिक स्थिरतेला चांगला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.