ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 जागांसाठी भरती, पगार 85000

जून 22, 2025 4:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.

sbi 1

या भरतीद्वारे एकूण 2964 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025आहे. निवडलेल्या उमेदवाराला त्याने ज्या क्षेत्रात अर्ज केला आहे त्याच क्षेत्रात पोस्टिंग मिळेल.

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:- २१ वर्षे ते ३० वर्षे. उमेदवाराचा जन्म ३० एप्रिल २००४ नंतर आणि १ मे १९९५ पूर्वी झालेला नसावा. एससी/एसटीसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसीसाठी तीन वर्षे सूट असेल.
पगार : 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
एसबीआय सीबीओ अर्ज शुल्क २०२५
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: ७५० रुपये
अनुसूचित जाती/जमाती/अपंगत्व: शून्य
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2025  30 जून 2025

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment