ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 2273 जागांवर भरती, पगार 85000

जानेवारी 30, 2026 3:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 2273 रिक्त पदे भरली जाणार आहे.

sbi 1

पदवी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू झाली आणि १८ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.bank.in ला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही भरती आयबीपीएसद्वारे केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 31 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. [SC/ST/PWD: फी नाही]

किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी बेसिक सॅलरी ४८,४८० रुपये असणार आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करून एसबीआय सीबीओ भरती २०२६ साठी त्यांचे ऑनलाइन अर्ज पूर्ण करू शकतात.
प्रथम, अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, एसबीआय सीबीओ भरती २०२६ लिंकवर क्लिक करा.
वेबसाइटवरील चालू उघडण्याच्या टॅबवर जा.
अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा वर क्लिक करा.
आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
अर्ज शुल्क भरा, फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now