SBI Clerk Bharti : ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी खुशखबर! स्टेट बँकेत क्लार्क पदाच्या तब्बल 5180+पदांसाठी भरती सुरु

ऑगस्ट 6, 2025 12:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पदवी पास असलेले आणि सरकारी बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लर्क (ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट सेल्स) पदांसाठी जम्बो भरती जाहीर केली आहे. विशेष या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच ६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

SBI Clerk Bharti 1

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन किंवा या पेजवरून भरतीत सामील होण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण तब्बल ५१८० पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. रिक्त पदांपैकी २२५५ अनारक्षित आहेत. ७८८ एससीसाठी, ४५० एसटीसाठी, ११७९ ओबीसीसाठी आणि ५०८ ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी राखीव आहेत.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा. यासोबतच, उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय २० वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयात सूट दिली जाईल. लक्षात ठेवा की वयाची गणना १ एप्रिल २०२५ लक्षात घेऊन केली जाईल.

पगार : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7- 57400-4400/1-61800-2680/1-64480.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज कसा करायचा

एसबीआय क्लर्क अर्ज फॉर्म २०२५ भरण्यासाठी, प्रथम अधिकृत ibpsonline.ibps.in/sbijajul25/ पोर्टलला भेट द्या.
आता नवीन पृष्ठावर नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
नोंदणीनंतर, उमेदवारांनी इतर तपशील, स्वाक्षरी, छायाचित्र अपलोड करावे.
शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क (लागू असल्यास) जमा करावे आणि फॉर्म सबमिट करावा.
यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा. प्रिंट घेण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now