जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

नाथाभाऊंच्या गटाची सरशी, जिल्हा दूध संघात जगदीश बढे बिनविरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत एकनाथ राव खडसे यांच्या गटाने पहिला विजय मिळवला आहे. छाननी नंतर रावेरमधून एकनाथराव खडसे यांच्या समर्थकाचा बिनविरोध विजय झाला आहे. रावेर मतदारसंघातून जगदीश लहू बढे यांचाविजय झाला आहे.

अधिक माहिती अशी कि. जळगाव जिल्हा सहकारी दुध संघाच्या निवडणुकीसाठी आज छाननीचा शेवटचा दिवस होता. यातून विविध मतदारसंघासाठींच्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत. यात रावेर मतदारसंघातून जगदीश लहू बढे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनी निवड निश्चीत झाली आहे. ते आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असून ते आधीच्या संचालक मंडळातही निवडून आले होते. या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपले विजयाचे खाते उघडले आहे.

दरम्यान, आज छाननीच्या नंतर दुध संघातील लढतींचे प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे. आता माघारीच्या कालावधीत काही उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. यानंतरच खरेच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणुकीतील पहिली बाजी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसने व अर्थातच एकनाथराव खडसे यांनी मारल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Back to top button