⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गावात पाणी नसल्याच्या वादावरून सरपंच – ग्रामस्थांची हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । गावात ४ दिवसांपासून पाणी नाही, गावातील लोकांनी मरायचे का? मला गावातील लोक तुम्हाला निवडून का दिले आहे, असे बोलतात. असे बोलल्याच्या कारणावरून सरपंच व ग्रामस्थांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसांत दोन तक्रार दाखल करण्यात आल्या आहे.

चोपडा, विरवाडे येथील ग्रामस्थ मनोहर संतोष कोळी (वय ४०) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. कोळी यांना दि.२८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विरवाडे ग्रामपंचायतचे शिपाई विजय खंबायत यांनी ग्रामपंचात कार्यलयात बोलविले. दरम्यान, सरपंच विशाल म्हाळके यांनी फिर्यादी कोळीस तू ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दादागिरी का करतो ? असे बोलले. त्यामुळे फिर्यादी कोळी यांनी गावात ४ दिवसांपासून पाणी नाही, गावातील लोकांनी मरायचे का? मला गावातील लोक तुम्हाला निवडून का दिले आहे असे बोलतात. असे बोलल्याच्या कारणावरून फिर्यादी कोळी यांना तब्बल १३ जणांनी मिळून चापटा, बुक्यांनी, लाथांनी मारहाण करून अश्लीय शिवीगाळ केली. याला गावातून हाकलून घ्या, नाहीतर याची ३०२ करून टाकू अशी धमकी दिली.

याबाबत कोळी यांनी दि.२८ रोजी सायंकाळी चोपडा शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विशाल आत्माराम म्हाळके, आत्माराम म्हाळके, प्रभाकर कोळी, गजानंद कोळी, मुलचंद कोळी, हेमंत कोळी, ईशवर सपकाळे, सुनील कोळी, बापू कुमावत, प्रवीण कोळी, नथ्थू कोळी, बापू कोळी, (एकाच नाव माहित नाही) सर्व रा. विरवाडे व मालापूरचा पावरा ता. चोपडा अश्या एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले करीत आहे.

जगन कुतवाल पावरा (वय ३७ रा.मालापूर ता.चोपडा) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. सरपंच विशाल म्हाळके यांना संशयित आरोपींनी विरवाडे ग्रामपंचायत कार्यलयात बोलावून तुम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अश्लीय शिवीगाळ का करतात असे बोलून सरपंच विशाल म्हाळके व फिर्यादीस काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. संशयित आरोपी अमोल पाटील याने ग्रामपंचायत बाहेर जाऊन दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर फेकून जखमी केले. याबाबत जगन पावरा यांनी २८ रोजी सायंकाळी चोपडा शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संतोष कोळी, अनोल पाटील, सुवर्णसिंग पाटील सर्व रा.विरवाडे ता. चोपडा या निघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले करीत आहे.