जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । सावदा येथून जवळ असलेल्या थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन प्रकाश मोरे यांना अपात्र घोषित करण्यात आले. असे आदेश उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी २४ रोजी दिले. याबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे सात ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली होती.

थोरगव्हाण येथील सरपंच सचिन मोरे व ग्रामसेवक यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ या ग्रामपंचायतीच्या सलग दोन मासिक सभा न घेतल्याने येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र चंद्रकांत चौधरी, कविता संदीप चौधरी, सुरेखा रामदास कोलते, उज्वला यशवंत बाउस्कर, सचिन नंदकुमार चौधरी, सुपडू दोधू मोरे, आशा सुपडू मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर निकाल देताना ग्रामपंचायतीच्या सलग दोन मासिक सभा न घेतल्याने सचिन मोरे यांना थोरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कायम राहण्यास महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम १९५९ चे कलम ३६ अन्वये अपात्र घोषित करण्यात येत असल्याचे आदेश २४ रोजी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिले.

हे देखील वाचा :
- पावसाळ्यात विकेंडचा प्लॅन करताय? मग जळगाव जिल्ह्यातील ‘या’ निसर्गरम्य स्थळांना नक्की भेट द्या!
- काईट फोरमतर्फे जिल्ह्यातील स्टार्टअप फाऊंडर्स व को-फाऊंडर्सचा सत्कार
- दमदार पुनरागमनंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूनला ‘ब्रेक’? वाचा हवामान विभागाचा चिंताजनक अंदाज..
- ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार! महाराष्ट्रासह १८ राज्यांना ‘हाय अलर्ट’; जळगावसाठीही महत्वाचा इशारा
- दुर्दैवी ! पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू







