⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदिप पाटील

भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदिप पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा तालुका अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून वडगाव कडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते भाजपा अटल कार्यालयात निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी संदिप पाटील यांना भाजपा अटल कार्यालयात निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान केले. तसेच आगामी काळांत आध्यात्मिक क्षेत्रात नवनवीन सामाजिक उपक्रम तथा पक्ष वाढीसाठी अमोल शिंदे यांनी संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे समवेत तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,प्रज्ञावंत आघाडीचे सुनिल पाटील,माजी सभापती बन्सीलाल पाटील,ओबीसी सेल जि.सरचिटणीस प्रदिप पाटील उपस्थीत होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.