प्रवाशांसाठी दिलासा! साईनगर शिर्डी–बिकानेर एक्स्प्रेसला पुन्हा मुदतवाढ, आता कधीपर्यंत धावणार?

मार्च 27, 2026 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शिर्डी साईबाबा आणि राजस्थानमधील खाटुश्याम दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत पुन्हा वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांसह व्यावसायिक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

shirdi bikaner train

०४७१५ बिकानेर–साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी २८ मार्चपर्यंत दर शनिवारी चालविण्यात येणार असल्याचे अधिसूचित करण्यात आले होते. मात्र, या गाडीचा कालावधी आता ११ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १५ सेवा या गाडीच्या होतील.

तसेच ०४७१६साईनगर शिर्डी–बिकानेर ही साप्ताहिक विशेष गाडी २९ मार्चपर्यंत दर रविवारी चालविण्यात येणार असल्याचे अधिसूचित करण्यात आले होते. या गाडीचा कालावधी आता १२ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत एकूण १५ सेवा या गाडीच्या होतील.

या स्थानकांवर आहेत थांबा?

या गाड्यांना दोन्ही बाजूने मनमाडसह भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चुरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ, अशा प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now