⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आरवी इंटरटेनमेंट्सतर्फे मुंबई पार पडला इंडियाज फॅशन लीग

आरवी इंटरटेनमेंट्सतर्फे मुंबई पार पडला इंडियाज फॅशन लीग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । आरवी एंटरटेनमेंट्स तर्फे इंडियाज फॅशन लीग 2022 आरबीआयनिक अवार्ड 2022 शेरेटन नवी मुंबईच्या फोर पॉइंट्स या पंचतारांकित हॉटेल येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाने पूर्ण नवी मुंबईचे लक्ष वेधले. याचे आयोजन जळगांव येथील दाम्पत्य संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांनी केले होते.

शास्त्री दाम्पत्याकडे या कार्यक्रमाचे बौद्धिक संपदा हक्क आहेत. प्रमुख पाहुणे दुसरे कोणी नसून पुष्पाचा हिंदीतील आवाज देणारे श्रेयस तळपदे होते आणि त्यांनीच सर्व पुरस्कत्यांना अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी देऊन पुरस्कृत केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अलंकृत महाय, पायल घोष, निकिता रावल, चाहत खन्ना, राखी सावंत, डॉल्फिन दुबे, राजीव अडातिया, वेरोनिका वनीज, धृती सहारन, अला क्रिसलिझकी, हिमानी भाटिया, अलंकृत सहाय, लुवेना लोध, कॅनिशा अवस्थी, पिंकी मिंकी, राजीव अदातिया, निकिता रावल, मेलविन लुईस, राखी सावंत, रितेश सिंह, रोशनी कपूर, खुशी गुप्ता आणि अनेक बॉलिवूड मधील नावाजलेले प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. सेलिब्रिटी अँकर सिमरत आहुजाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार यांचे मौल्यवान मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. मिड डे, INIFD पनवेल, फोर पॉइंट्स बाय शेरेटन वाशी, नवी मुंबई, इंटेरियर मॉलचे सीईओ कुणाल ठक्कर, मर्सिडीजचे ऑटोहँगर हे कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर होते. मिलिंद राणे, अथर्व मीडिया वर्ल्ड, फिरोज शेख शो डायरेक्टर आणि कोरिओग्राफर यश शेलार शो डायरेक्टर आणि कोरिओग्राफर, हरमीत सिंग गुप्ता, प्रोडक्शन हेड, देव अग्निहोत्री, सूरज कुटे, इंडिंग पार्टनर, मैकअप पार्टनर, लैक्मे अकादमी, खारघर, सर्व गिफ्टिंग पार्टनर, सर्व सपोर्टिंग पार्टनर, सर्व डिझाइनर आणि मॉडेल्स छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमात जळगाव, धुळे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथूनच नव्हे तर दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद व छत्तीसगड येथून सुद्धा मॉडेल्स आणि डिझायनर्सनी सहभाग नोंदवला हे पुरस्कार म्हणजे नवीन उभरत्या कलाकारांच्या कलागुणांत असलेल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रतिबिंब होय. आमच्याकडे उदयाचे काही उत्कृष्ट सुपरस्टार आहेत. अश्या प्रकारचे पुरस्कार या कलाकारांना तिथे आउन मनोरंजन करण्यासाठी आवश्यक प्रमाणीकरण आणि आत्मविश्वास देतात. असे मनोगत श्रेयसने दिले, शास्त्री एंटरटेनमैट्सच्या संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांच्या या कार्याचे श्रेयसने व इतर सर्व बॉलिवूड कलाकारांनी कौतुक केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह