---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील फातेमा नगरात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

raid gas

याबाबत असे की, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे शनिवार दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून छापा टाकला.शोएब शेख शफी (वय-२०, रा.फातेमा नगर) याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

---Advertisement---

संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गिते अशांनी केली आहे. घटनास्थळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---