प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ-वर्धा-भुसावळ मेमू या राहणार तारखेला रद्द..

डिसेंबर 15, 2024 1:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही काही दिवसात भुसावळ मार्गे वर्धाकडे मेमूने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सिंधी स्थानक व यार्डमध्ये महत्त्वाची सुधारणा कार्यासाठी १८ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी भुसावळ-वर्धा-भुसावळ मेमू रद्द केली आहे.

memu jpg webp

ब्लॉकमुळे ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस १८ रोजी वर्धा स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली आहे. ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदिया ऐवजी वर्षा स्थानकावरून नियोजित वेळी सुटणार आहे. १११२१ भुसावळ-वर्धा मेमू व १११२२ वर्षा-भुसावळ मेमू १८ रोजी रद्द केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now