ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सोन्याचा भाव पुन्हा घसरला, जळगावात आता असे आहेत भाव?..
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । एकीकडे लग्नसराईची धामधूम सुरु असताना मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. यामुळे सोन्याचे दर पुन्हा उच्चांकी दिशेने धावत होते. मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे आज रविवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७७,००० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे शनिवारी चांदीचा दर स्थिर दिसून आला. सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९२,००० हजार रुपयावर विकला जात आहे.
खरंतर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. गेल्या दोन दिवसात सोने दरात तब्बल १७०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी दरात ४००० रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत.