Railway Job : 10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर ! रेल्वेत तब्बल 32,438 पदांच्या भरतीला सुरुवात

जानेवारी 23, 2025 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वेनं ‘ग्रुप D’ पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली. विशेष दहावी पास असलेल्या तरुणांना रेल्वेत नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीमार्फत एकूण 32 हजार 438 जागा भरल्या जाणार आहे. RRB Group D Bharti 2025

RRB Grup D Bharti 1

या नोकरीसाठी अर्ज २३ जानेवारी म्हणजेच आजपासून करु शकणार आहात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही rrbahmedabad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. RRB Group D Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी किंवा आयटीआय प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा: उमेदवारांचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी (CBT)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी

वेतनश्रेणी : १८,०००/- ते २२,०००/- रुपये प्रति महिना.
इतर भत्ते: डीए, एचआरए आणि इतर रेल्वे कर्मचारी फायदे.
अर्ज शुल्क किती भरावी लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरायचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now