“तीन वर्ष झाली, त्या मुलीला न्याय मिळेल का? भडगावातील प्रकरणावर रोहित पवार आक्रमक

मे 7, 2026 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी भडगाव येथे तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार व हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या पीडित कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिला सुरक्षा, फास्टट्रॅक कोर्ट, शक्ती कायदा आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

rohit pawar

काय म्हणाले रोहित पवार?

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 2023 मध्ये घडलेली सात वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येची घटना आजही महाराष्ट्राच्या स्मरणात ताजी आहे. या अमानुष घटनेनंतर संपूर्ण राज्य पीडित कुटुंबाच्या बाजूने उभे राहिले होते. न्याय मिळावा यासाठी त्या वेळी फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा करण्यात आली होती. पुण्यातल्या प्रकरणात देखील फास्टट्रॅक कोर्ट आहे. फास्टट्रॅक कोर्टचा फायदा होतो का हे जर बघायचं असेल तर गोंडगाव मधील घटना आपण बघितली पाहिजे. तीन वर्ष होऊन सुद्धा फास्टट्रॅक कोर्टमध्ये अजून पर्यंत न्याय मिळाला नाही नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

आज परिवाराला भीती वाटत आहे त्या मुलीला न्याय मिळेल का? कायदा खरच गरीबाच्या बाजूने आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मी सरकारला विनंती करेल 2019 मध्ये आणलेला शक्ती कायदा लागू करा, त्यात अजून काही गोष्टी कडक कराव्यात. त्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना असं कृत्य करताना भीती वाटेल, लहान मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी कमी होतील. या प्रकरणांमध्ये कुठेही राजकारण न आणता परिवाराला न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

ज्याच्याकडे पैसा आहे ते आपल्या मुलींना सेक्युरिटी लावू शकतात. पण गरीबाचं काय? अजित दादांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रात न्याय मिळवण्यासाठी अडचणी येत असतील मग गरिबाकडे कोण बघणार आहे,असंही रोहित पवार म्हणाले.

वर्षभरात पन्नास हजार पेक्षा जास्त गुन्हे महिलांबाबतीत महाराष्ट्रात दाखल झाले आहे. दिवसाला 137 गुन्हे, महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार होत आहे, तासाला एक बलात्कार होतो. वर्षभरात 13 हजार लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटत नाही का? त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का? पोलिसांना वेगळं काम दिले जात असल्याने या प्रकरणांकडे दुर्लक्ष होतं असं मला वाटतं, असेही रोहित पवार म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now