---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

..तर कसं चालेल ; शरद पवारांसमोरच रोहिणी खडसेंनी केली नाराजी व्यक्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात घरवापसी करणार आहे. मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रोहिणी खडसेंवर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसून येत आहे. दरम्यान, काल जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात बोलताना रोहिणी खडसे यांना भाषण उरकण्याची सूचना मिळाल्याने त्यांनी भाषणातून आपली नाराजी व्यक्त केली.

rohini khadse shrad pawar jpg webp

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
“शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला असून व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे. एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी शरद पवारांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत आणि तिथे महिलांना समसमान अधिकार आहेत,” असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

---Advertisement---

आमच्या रक्तात गद्दारी नाही..
दरम्यान, यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही महत्वाचे विधान केले. नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीत भाजपमध्ये जात आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. आमच्या रक्तात गद्दारी नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---