जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । एरंडोल येथे पंचायत समिती गणांच्या आरक्षणासाठी प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक होऊन आठ गणांच्या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती नामाप्रवर्ग, सर्वसाधारण याप्रमाणे त्या गणांचा प्रवर्ग निश्चित करण्यात आला. त्यानंतर त्यामधून ५० टक्के महिला आरक्षण काढण्यात आले. मयंक सोनवणे या मुलाच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढून अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आला. आडगाव गट अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आला. पंचायत समिती सदस्य पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पहिल्यांदा निघाले. त्यामुळे ते सर्वसाधारण ठेवायचे की अनुसूचित जाती महिला ठेवायचे यासाठी ईश्वर चिट्ठी काढण्यात आली, रंवजे बु गण सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आला.
विखरण-अनुसूचित जाती महिला, बांभोरी खुर्द- अनुसूचित जमाती महिला, कासोदा – नागरिकांच्या मागास प्रवर्ग, आडगाव-नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला, रिंगणगाव-सर्वसाधारण, रंवजे सर्वसाधारण महिला साततळी सर्वसाधारण बुद्रुक-सर्वसाधारण महिला, तळई-सर्वसाधारण, उत्राण अ.ह- सर्वसाधारण. यावेळी प्रभारी तहसीलदार किशोर माळी, ज्ञानेश्वर आमले, किशोर उपाचार्य, राजेंद्र वाघ, वासुदेव पाटील, नाना महाजन, दिलीप रोकडे आदी उपस्थित होते.