⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अमळनेरमध्ये ग्राफिक्स डिझाईनर असोसिएशनची नोंदणीकृत स्थापना

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । प्रिंटिंग क्षेत्रातील अविभाज्य भाग म्हणजेच ग्राफिक्स डिझाईन आणि याच डिझाईन कलाकारांची सुद्धा एकता व्हावी आणि अमळनेर तालुक्यातील ग्राफिक्स डिझाईनर बांधवांची एकत्रित चळवळ घडवून अमळनेर शहर व तालुका ग्राफिक्स डिझाईनर असोसिएशनची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली.

असोसिएशन नोंदणी करण्याचा उद्देश एवढाच की आपल्या काम व कलेच्या दृष्टीने पैसे आकारले जावे कलाकार हा सुद्धा महत्वाचा घटक आहे वाढती महागाई पहाता आम्ही देखील नियम वाढवले असले तरी पैसे मात्र कलाकारीच्या आधारे आकारात असतो. असे ग्राफिक्स डिझाईन असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष समीर शेख यांनी सांगितले. या कलाकारी सेवा पुरवणारं एक डिजीटल माध्यम म्हणजेच ग्राफिक्स डिझाईनर मात्र यंदाच्या नवनवीन अपडेशनमुळे सर्वांनी एकत्र यावं. व नेहमी मदतीच्या प्रयत्नात सर्वांनी आपला एक आदर्श घडवावा या उदात्त हेतूने स्वतंत्र व्यासपीठ संपूर्ण तालुक्यासाठी नवनवीन उपक्रम घेऊन सामाजिक सेवेत देखील कार्यतत्पर असेल असे डिझाईन असोसिएशनचे मार्गदर्शक सल्लागार लक्ष्मीकांत सोनार यांनी सांगितले.

श्री मंगळग्रह संस्थान येथील आयोजित बैठकीत नियुक्तिपत्रे व आय कार्ड वाटप करण्यात आली. अध्यक्षपदी समीर शेख, उपाध्यक्षपदी शुभम पवार, सचिवपदी प्रतिक बोरसे, सहसचिवपदी महेश करंजे, सेक्रेटरीपदी विनोद चावरीया, सह सेक्रेटरी पदी राहुल बिर्हाडे, खजिनदारपदी कुमार रणधीर यांची एकमताने निवड करण्यात आली. अल्पावधीतच चांगला टप्पा गाठत व्यावसायिक आदर्श व जागरूकताच्या माध्यमातून विचार करून असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक नवडिझाईनरांना यात सामिल व्हायची देखील संधी याद्वारे उपलब्ध करून दिली आहे. असे ही ते म्हणाले यावेळी असोसिएशनचे सदस्य विशाल पाटील, ज्ञानेश्वर पिंगळे, मोहित महाजन, महेश भावसार, अथर्व पिंगळे, शंतनु जाधव उपस्थित होते.

हे देखील वाचा: