धक्कादायक ! नाशिकमध्ये जळगावच्या २० वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या

जुलै 18, 2026 9:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक येथील इंदिरानगर भागातील वनसंपदा सोसायटीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका २० वर्षीय तरुणीची चाकूने सपासप वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. वैष्णवी अनिल आवारे (वय २०, रा. अमळनेर, जि. जळगाव) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव असून या थरारक हत्याकांडामुळे जळगाव आणि नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे.

Chopper murder

मृत वैष्णवी आवारे मूळची अमळनेर येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये एका ठिकाणी पेइंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारा तरुण हा वैष्णवीचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये शुक्रवारी सायंकाळी एका ठिकाणी चर्चा झाली होती. त्यानंतर रात्री दत्त मंदिराजवळ आरोपीने तिच्यावर अचानक चाकूने सपासप वार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हल्ल्यावेळी वैष्णवीने बचावासाठी मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, त्यांच्या मदतीला पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाला. गंभीर जखमी झालेली वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाजवळून हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला असून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा हेतू याचा तपास पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now