⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी बाबद फारूक अब्दुल्ला म्हणले…

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास नकार दिल्यानंतर आता फारूक अब्दुल्ला यांनी देखील नकार दिला आहे. ‘माझी जम्मू काश्मीरला जास्त गरज’ असल्याचे सांगत अबदुल्ला यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे नाव सुचवले होते. मात्र, आता फारुख अब्दुल्ला यांनीही राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनण्यासाठी नकार दिला आहे. अबदुल्ला यांच्या नकारानंतर विरोधी पक्षांकडे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर पुन्हा विचार विनिमय करण्याची वेळ आली आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांशी चर्चा करुन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी समान विरोधी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल.

विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सर्वांना मान्य असेल अशा व्यक्तीच्या नावाचा विचार केला जात होता. त्यानंतर बैठकीत शरद पवारांचे नाव समोर आले. मात्र, पवारांनी राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) एन. च्या. प्रेमचंद्रन यांनी ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळ कृष्ण गांधी यांची नावे विरोधी पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून सुचवली. फारुख अब्दुल्ला हे तीन वेळा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. याशिवाय ते अनेकवेळा केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. सध्या ते गुपकर घोषणेच्या अध्यक्षस्थानी आहेत.