⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात; वाचा आताचे नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असून आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडर दरात मोठी कपात केली आहे. आज 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.

१ मे रोजी दर वाढविण्यात आले
1 जून रोजी दरात कपात केल्यानंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2354 ऐवजी 2219 रुपयांचा झाला आहे. तसेच कोलकात्यात २४५४ ऐवजी २३२२ रुपये, मुंबईत २३०६ ऐवजी २१७१.५० रुपये आणि चेन्नईत २३७३ ऐवजी २५०७ रुपये आहेत. कंपन्यांनी दिलेल्या या सवलतीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल. यापूर्वी 1 मे रोजी दरात सुमारे 100 रुपयांनी वाढ झाली होती.

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी
कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. याआधी जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरचे दर (एलपीजी सिलेंडर किंमत) 50 रुपयांनी वाढले होते. 19 मे रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत बदल झाला.