तरुणांसाठी मोठी संधी! पशुसंवर्धन विभागात पदभरती लवकरच

मार्च 4, 2026 6:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतीबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गांतील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला.

job jpg webp

विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, वाढीव पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) सोबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार 25 एप्रिल 2025 रोजी एलडीओ (पशुवैद्यकीय विकास अधिकारी) पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी वर्ग-एक दर्जाच्या सहा सहाय्यक आयुक्तपदांची जाहिरातही काढण्यात आली आहे.

परीक्षेसाठी पेपर सेटिंग प्रक्रियेसाठी तज्ज्ञ अधिकारी व प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक असून पेपर सेटिंगचे काम पूर्ण होताच परीक्षा घेण्यात येईल, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर, एमपीएससीकडूनही भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपर्यवेक्षकांची पदे जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात येणार असून त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा झाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार वाढलेल्या पदांची भरती अपरिहार्य आहे. त्यानुसार सर्व प्रक्रिया सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात पदभरती पूर्ण होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now