कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे नोकरी मिळविण्याची संधी ! लिपिक, शिपाईसह ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

ऑगस्ट 11, 2025 6:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि. जळगाव मार्फत विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

job jpg webp

या भरतीद्वारे उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता ही रिक्त पदे सरळ सेवेने भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांना www.apmcamalner.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. भरती संदर्भातील अधिक माहिती व तपशील करिता www.apmcamalner.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

जाहिरात पहा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now