जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । जर तुम्हीही होम लोन (Home Loan) ईएमआय (EMI(भरत असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. देशातील करोडो जनतेला सात दिवसांत दुसरी भेट मिळाली आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले होते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) ने रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) व्याजदरात २५ बेसिस पॉइंट कपात आज शुक्रवारी जाहीर केली. यासह रेपो दर 6.25% पर्यंत खाली आला.

विशेष म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल ५ वर्षांनी रेपो रेटमध्ये कपात केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये २०२० मध्ये रेपो रेट कमी करण्यात आला होता. त्यानंतर आज पाच वर्षांनी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेट वाढवण्यात आला होता. त्यानंतर आज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे
आता रेपो रेट ६.५० वरुन ६.२५ करण्यात आला आहे. यामुळे आता कर्जाचा ईएमआय कमी होणार आहे.रेपो रेटवर आधारित कर्जाचे व्याजदर ठरवले जाते. रेपो रेटनुसार कर्जावर व्याजदर आकारले जाते. सर्व बँका रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट फॉलो करतात. त्यानंतरच व्याजदर ठरवतात. आता हा रेपो रेट कमी झाल्याने बँकांचे व्याजदरदेखील कमी होणार आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात झाली आहे. त्यामुळे EMI देखील कमी झाला आहे.
याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात ४.७ टक्के महागाई राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात ही महागाई अजून कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेपो रेट कमी करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान,रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता रेपो रेट कमी करुन रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.