जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. RBI ने ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. विशेष दहावी पास ते अंडरग्रॅज्युएट उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण ५७२ पदे रिक्त आहे.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया आज, म्हणजेच १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकतात. ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येतील.

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहे. विविध राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, मुंबई, दिल्ली, पाटना येथे ही भरती केली जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत असणार आहे. एकूण २९१ अनारक्षित पदांसाठी भरती केली जाणार आहे. यानंतर ८३ ओबीसी, ५१ ईडब्ल्यूएस, ५८ एसटी, ८९ एससी जागा आरक्षित आहेत.
शैक्षणीक पात्रता काय?
रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी १० पास उमेदवार अर्ज करु शकतात. अंडरग्रॅज्युएट उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४२५० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचआरए मिळणार आहे. सध्या ऑफिस अटेंडंट पदासाठी ४६,०२९ रुपये पगार मिळत आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
अशी होणार निवड प्रक्रिया :
रिझर्व्ह बँकेतील ऑफिस अटेंडंट पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणा आहे. रीजनिंग, इंग्लीश, जनरल अवेअरनेस या विषयांची ऑनलाइन टेस्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.












