जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रिझर्व्ह बँकेत (RBI) सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. आरबीआयने ग्रेड बी ऑफिसर पदांच्या १२० रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच १० सप्टेंबरपासून सुरू होईल, जी ३० सप्टेंबर २०२५ या शेवटच्या तारखेपर्यंत सुरू राहील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील

रिक्त पदांचा तपशील :
ऑफिसर ग्रेड बी जनरल: ८३ पदे
ऑफिसर ग्रेड बी डीईपीआर: १७ पदे
ऑफिसर ग्रेड बी डीएसआयएम: २० पदे

शैक्षणीक पात्रता काय?
आरबीआय ग्रेड बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. इकोनॉमिक्स, फायनान्समध्ये मास्टर्स, पीजीडीएम किंवा एमबीए डिग्री प्राप्त केलेली असावी.
वयाची अट :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३० वयोगटातील असावे.
निवड पद्धत :
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे.१८-१९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी.












