जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये मोठी संधी आहे RBI ने ग्रेड A आणि B च्या विविध पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आज म्हणजेच 11जुलैपासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. या भरतीद्वारे एकूण 28 जागा भरल्या जाणार आहे. RBI Recruitment 2025

या पदांसाठी होणार भरती?
1) लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ – 05 पदे
2) मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ – 06 पदे
3) मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’- 04 पदे
4) असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ – 03 पदे
5) असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ – 10 पदे

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 किमान 21 ते कमाल 40 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹600+18% GST/- [SC/ST/PWD: ₹100+18% GST/-]
इतका पगार मिळेल ?
ग्रेड ‘अ’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना 62500 – 3600 (4) – 76900 – 4050 (7) – 105250 – EB – 4050 (4) – 121450 – 4650 (1) – 126100 (17 years) इतका पगार मिळेल
ग्रेड ‘ब’ ऑफिसर साठी निवडलेल्या उमेदवारांना ₹78450 – 4050 (9) – 114900 – EB – 4050 (2) – 123000 – 4650 (4) – 141600 (16 years) इतका पगार मिळेल
अर्ज कसा करायचा
आरबीआयची अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in ला भेट द्या.
“Opportunities@RBI” विभागावर क्लिक करा.
“Recruitment for Grade A & B Posts 2025” लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज भरा.
कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.












