अरे वा! आता कार्डशिवाय काढता येणार ATM मधून पैसे, वाचा आरबीआयचा नवा नियम

मे 20, 2022 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । सध्या डिजिटल व्यवहारांच्या जमान्यात एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बरेच जण UPI द्वारे व्यवहार करीत आहे.पण अशात जर तुम्ही घराबाहेर पडाल आणि तुमचे एटीएम कार्ड सोबत आणायला विसरलात. तरीही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि एटीएम ऑपरेटरना एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार आहात.

atm jpg webp

रोख रक्कम काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार
आरबीआयचा हा नियम लागू झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. याचा फायदा असा होईल की कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होईल. कार्डलेस व्यवहारात पैसे काढण्यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही. यामध्ये तुम्ही पेटीएम, गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे किंवा फोनपे सारख्या UPI पेमेंट अ‍ॅप्सद्वारेच एटीएममधून पैसे काढू शकाल.

NPCI ला UPI एकत्रीकरण सूचना
आरबीआयच्या सूचनेनंतर आता सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटरना कार्डलेस कॅश काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नियमांनुसार कोणतीही बँक कोणत्याही बँकेच्या खातेदाराला ही सुविधा देऊ शकते. यासाठी NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना मिळाल्या आहेत.

चार्ज मध्ये बदल नाही
एटीएम कार्डवर सध्या आकारले जाणारे शुल्क बदलानंतरही तेच राहतील. यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याशिवाय, कॅशलेस व्यवहारातून पैसे काढण्याची मर्यादा देखील पूर्वीप्रमाणेच राहील.

हे वैशिष्ट्य कसे कार्य करते
कार्डलेस व्यवहाराची सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या एटीएममध्ये उपलब्ध आहे. नवीन प्रणालीनुसार, ग्राहकाला यापुढे एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकाला एटीएममध्ये क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर, 6 अंकी UPI टाकल्यावर पैसे बाहेर येतील.

RBI चा उद्देश काय?
कॅशलेस कॅश काढण्याची प्रणाली लागू करण्यामागील RBI चा उद्देश वाढत्या फसवणुकीच्या घटना कमी करणे हा आहे. यामुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, पैसे काढण्यासाठी तुम्हाला कार्डची गरज भासणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now