जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं हाताळली जातात. मात्र ३१ मार्च रोजी ईद असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. तर बँकांना सुट्टी असणार कि नाही याबाबत मोठी अपडेट समोर आलीय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ मार्चची बँक सुट्टी रद्द केली आहे. मात्र या प्रसंगी ग्राहकांसाठी सामान्य बँकिंग सुविधा उपलब्ध होणार नाहीत. ग्राहक डिजिटल आणि नेट बँकिंग सेवा वापरून आर्थिक व्यवहार करू शकतात.

२०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत. त्यामुळे फक्त १ दिवस रविवारी बँका बंद राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा उपलब्ध असतील?
ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात, जोपर्यंत बँक कोणतीही सुचना देत नाही. अन्यथा, सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. अशा दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.