युवक काँग्रेसच्या रावेर विधानसभा अध्यक्षपदी फैजान शाह
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । माहे ते डिसेंबर २०२१ पर्यत युवक काँग्रेसची ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले. त्यात जास्तीत जास्त युवकांना काँग्रेस पक्षाशी जोडून घेतल्या बाबत यावल येथील रहिवासी फैजान अब्दुल गफ्फार शाह यांना ऑनलाईन पद्धतीने रावेर विधानसभेच्या अध्यक्षपदी घोषित करण्यात आले.
२७ ऑक्टोबर २०२१ ते २ नोव्हेंबर २०२१ मोनिनेशन दाखल करणे, १२ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ सभासद नोंदणी करणे, २० फरवरी २०२२ ते २८ फरवरी २०२२ स्क्रुटणी या निवडणूक’चा निकाल ७ मार्च रोजी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. ज्यात सर्व उमेदवारांना मिळालेले मतानुसार पदे वितरीत करण्यात आली. त्यात फैजान अब्दुल गफ्फार शाह यांना २५६८ मत मिळून विधानसभा अध्यक्ष, मारुल येथील रहिवासी सय्यद मुदस्सर नझर यांना २५३५ मत मिळून विधानसभा उपाध्यक्ष तर फैजपूर येथील रहिवासी व माजी विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब यांना ७४७ मत मिळून विधानसभा महासचिव असे पद वितरित करण्यात आले. फैजान शाह हे समाज सेवक अशफाक शाह यांचे लहान भाऊ आहे.
निकाल जाहीर होताच यावल शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तसेच सर्व काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्याने फैजान शाहचा सत्कार केला व ज्यांची खास अपेक्षा न होती त्यांनी करून दाखवल असे मत देऊन काँग्रेसचे सर्व पदिधिकरी यांनी एकमेकांना पेडे देऊन मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक रसूल मेंबर, नगरसेवक हरून शेख, नगरसेवक मनोहर मेंबर, नगर सेवक समीर मोमीन, नगर सेवक समीर शेख, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, शहर अध्यक्ष कादिर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाले, समाज सेवक अशफाक शाह, समाज सेवक भुरा शाह आदी उपस्थित होते.