धक्कादायक ! महादेव मंदिरात शेतकऱ्याने घेतला गळफास, अमळनेर तालुक्यातील घटना

जुलै 11, 2024 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र यशवंत पाटील (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

succied fashi jpg webp

याबाबत असे की, रवींद्र पाटील हे जवखेडा येथे परिवारासह राहत असून ते शेती काम करून उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दि. १० जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरामधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा गोपी याने त्याचे काका गोकुळ धोंडू पाटील यांना कळवले.

गावाचे पोलीस पाटील प्रकाश सुकदेव कुऱ्हाडे यांच्यासह नागरिकांनी रवींद्र पाटील यांना अमळनेर ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोकुळ धोंडू पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ संजय पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now