⁠ 
सोमवार, मे 6, 2024

..तर एकनाथ खडसे कोथळीत पाय चेपत बसले असते ; मंत्री पाटीलांचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पावरा गटाचे आमदार एकनाथ खडसेंनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यावर बोचरी टिका केली होती. मंत्री अनिल पाटील हे चार महिन्यांचे मंत्री आहेत’, अशी टिका खडसेंनी केली होती. त्यावर मंत्री पाटलांनी जोरदार पलटवार केला.

‘चार महिने असो की चार दिवस मंत्री असलो तरी मी समाधानी आहे. उद्याही राजीनामा मागीतला तरी अडचण नाही. परंतु खडसेंना तर राष्ट्रवादीतही ध्यायला कोणी तयार नव्हते. आता भाजपत प्रयत्न केले तरी घेत नाहीत. तुम्ही आगामी चार वर्ष आमदार म्हणून बसले त्यात माझेही एक मत आहे. आम्ही मतदान केले नसते तर खडसे कोथळीत पाय चेपत बसले असते’, असा टोला लगावला.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात मंत्री पाटील यांनी कार्यकत्यांची बाजू जाणून घेऊन भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी कार्यकत्यांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.

न्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चचर्चा झाल्याचे ते म्हणाले, लोकसभेसाठी जिल्हा व विधानसभा स्तरावर महायुतीची समन्वय समिती गठीत केली जाणार आहे. जळगावात मविआला उमेदवार मिळत नसताना पारोळ्याचे माजी आमदार सतीश पाटील रावेरात जात होते. त्यांनी आधी पारोळ्यात ताकद दाखवावी. जळगावात उमेदवार मिळत नाही. रावेरात कोणाला हलाल करायचे? कोणाचा बळी द्यायचा अशी स्थिती आहे. मविआचे दुकान बंद पडले असून त्यांच्या गाडीत कोणी बसायला तयार नसल्याचे ते म्हणाले. मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.