बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

जिल्हा प्राणी कलेष प्रतिबंधक सोसायटीमध्ये अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्हा प्राणी कलेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची तीन वर्ष कालावधीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

गोशाळा, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयक कार्य करणारे सेवाभावी संस्थेचे सदस्य, प्राण्यांवर प्रेम करणारे , मानव हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी विहित नमून्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधार कार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, प्राणीमात्रांवर उल्लेखनीय काम केले असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी दाखला‌ सादर करणे आवश्यक आहे.

पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) मार्फत जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे १७ ऑगस्ट, २०२३ पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्जासंबंधी व इतर माहितीसाठी तालुक्यातील पंचायत समिती‌ पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी कळविले आहे.