जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । बॉलिवूडचा चॉकलेट बॉय सुपरस्टार रणबीर कपूर आणि लाखो दिलो कि धडकन आलिया भट्ट आज दुपारी ३;३० मिनिटांनी विवाहबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडच्या या मोस्ट अवेटेड लग्नाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज या प्रेमपक्षाची जोडी अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. 14 एप्रिल म्हणजे आज त्यांच्या लग्नाच्या विधीला सुरूवात झाली. आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी विवाह सोहळ्यात कपूर कुटुंबाशी संबंधित जवळपास प्रत्येक सदस्य सहभागी झाला आहे. बुधवारी संध्याकाळी आलिया-रणबीरचा मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याच्याशी संबंधित काही फोटो व्हायरल झाले आहेत. करिश्मा कपूरने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या मेहंदी सोहळ्यामधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करिश्माने पायाला मेहंदी लावली आहे. करिश्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने लिहिले, ‘मला मेहंदी आवडते.’ यासोबतच अभिनेत्रीने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.








