⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

रक्षाबंधन : भडगाव ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । रक्षाबंधन निम्मित भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राखी तयार करणे व चित्र रंगवणे अश्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, आनंदाने राखी बनवली व चित्र रंगवून आपल्या कलेचे प्रदर्शन केले.

शाळेचे मुख्यध्यापक अजबसिंग राजपूत व योगेश राजपूत यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व शिक्षिका वर्ग मनीषा पाटील, बिलाल शेख, विजय बाविस्कर, मयुरी पाटील, जयश्री तहसीलदार, भारती तहसीलदार, कल्याणी पाटील, शुभदा जिवरग, जयश्री पाटील,दर्शना शार्दूल, पल्लवी सोनावणे, शारदा शिंदे व शिपाई वैष्णवी ठाकरे व अनिता पाटील यांनी केले.