⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राकेश झुनझुनवालांनी टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमधून एका आठवड्यात कमावले 750 कोटी, तुमच्याकडे तर नाही?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आलीय. कधी वाढ तर कधी घसरण दिसून आलीय. अशात मात्र काही शेअरमध्ये तेजी दिसून आली. टाटा समूहाच्या टायटन कंपनीचा शेअरही अशाच शेअर पैकी एक आहे. दरम्यान, या शेअरने राकेश झुनझुनवाला यांना बंपर फायदा दिला आहे. त्यांना काही दिवसांत 750 कोटींहून अधिकचा फायदा झाला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 2124 रुपयांवरून 2295 रुपयांपर्यंत वाढला आहे.

राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारातील एक नाव आहे, ज्यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांचा खूप विश्वास आहे. तो जो शेअर खरेदी करतात, तो शेअर आपोआप चालू लागतो. एवढेच नाही तर तो पोर्टफोलिओमधून काढून टाकलेल्या शेअर्सलाही बाजारात खरेदीदार मिळत नाही.

शेअर्स 2124 ने वाढून 2295 रुपयांवर पोहोचले
गेल्या काही व्यवहारांच्या सत्रांमध्ये शेअर बाजारातील तेजीनंतर अनेक समभागांमध्ये तेजी दिसून आली. टाटा समूहाच्या टायटन कंपनीचा शेअरही अशाच समभागांपैकी एक आहे. टायटनमध्ये बिग बुलचा मोठा हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना काही दिवसांत 750 कोटींहून अधिकचा फायदा झाला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 2124 रुपयांवरून 2295 रुपयांपर्यंत वाढला आहे.

एका वर्षात 40 टक्के परतावा
26 मे 2022 रोजी टायटनचा शेअर 2124 रुपयांवर उघडला. टायटनमध्ये बिग बुलचा मोठा हिस्सा आहे. या शेअरमध्ये सतत वाढ दिसून आली. 31 मे रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, शेअरने 2295 रुपयांची पातळी गाठली. अशाप्रकारे, पाच दिवसांत हा शेअर सुमारे १७१ रुपयांनी वधारला.गेल्या जवळपास एका वर्षात या शेअरने सुमारे ४० टक्के परतावा दिला आहे.

5 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा
मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3,53,10,395 शेअर्स (3.98 टक्के) आहेत. पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये ९५,४०,५७५ शेअर्स (१.०७ टक्के) आहेत. अशा प्रकारे, दोघांचे एकूण 44,850,970 शेअर्स म्हणजेच टायटनमध्ये 5.05 टक्के शेअर्स आहेत.

शेअर्स 171 रुपयांनी झेपावले
टायटनचा शेअर गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये १७१ रुपयांनी वधारला आहे. त्यानुसार, 44,850,970 शेअर्सवर त्यांनी या कालावधीत 750 कोटींहून अधिक नफा कमावला आहे. मात्र, बुधवारच्या (१ जून) व्यापार सत्रात टायटनच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात, टायटनच्या समभागांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.

एका वर्षात या स्टॉकने सुमारे 40 टक्के परतावा दिला आहे. स्टॉकच्या गेल्या पाच वर्षांच्या परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो सुमारे 370 टक्के आहे.