---Advertisement---
हवामान

सावधान! राज्यात पुढील ५ दिवसांसाठी अवकाळी पावसाचा अंदाज जारी, जळगावलाही येलो अलर्ट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले असून यामुळे उन्हाचा चटका वाढला असून अंगाची लाही लाही होत आहे. एकीकडे राज्यात सूर्य तापत असताना दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

rain 1 2 jpg webp

IMD ने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने पिवळा इशारा पुढील ५ दिवसांसाठी जारी केला आहे. इतर ठिकाणी हलक्या पावसासह वादळ येऊ शकते. जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

---Advertisement---

हवामान विभागाने २९ मार्चला (IMD) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.यादरम्यान रत्नागिरीत काही भागांत हलक्या सरी बारसण्याची शक्यता आहे
३० मार्च रोजी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
३१ मार्च रोजी अहमदनगर, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
१ एप्रिल रोजी जळगाव, संभाजीनगर, पुणे, जालना, ठाणे रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.

या भागांमध्ये 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment